फॉर्च्युनर आणि रेंज रोव्हर कारमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा पराभूत उमेदवार चर्चेत; नेटकऱ्यांनी केल ट्रोल

लातूरचे वंचितचे पराभूत उमेदवार नरसिंहराव उदगीरकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताहेत.. त्याचं कारण म्हणजे उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान कार खरेदी केल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे नेटकऱ्यांना उदगीरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय.

वनिता कांबळे | Updated: Jun 19, 2024, 07:09 PM IST
फॉर्च्युनर आणि रेंज रोव्हर कारमुळे  प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा पराभूत उमेदवार चर्चेत; नेटकऱ्यांनी केल ट्रोल  title=

Narsingrao Udgirkar : आलिशान करा घेतल्यानं वंचितचे उमेदवार चांगलेच ट्रोल झालेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान कार खरेदी केल्याचं पोस्ट टाकली आहे.  एक फॉर्च्युनर आणि एक रेंज रोव्हर खरेदी केल्याची पोस्ट उदगीरकरांच्या मुलानं केली.. त्यानंतर नेटक-यांनी उदगीरकरांना चांगलंच ट्रोल केल आहे. काहींनी तर उदगीरकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेलं उत्पन्नाचं शपथपत्रच सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. 

उदगीरकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असल्याचं नमूद केले आहे.  त्यामुळे इतके कमी उत्पन्न असणारी व्यक्ती इतक्या महाग गाड्या कशा घेऊ शकते असा सवाल नेटक-यांनी उपस्थीत केला आहे. वंचितच्या उमेदवाराने गाडी घेऊ नये का असा सवाल नरसिंगराव उदगिरकर यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत सवाल केला आहे.

नेटकऱ्यांनी उदगीरकर यांना धारेवर धरलं

नरसिंगराव उदगीरकर हे वंचितचे लातूर लोकसभेचे उमेदवार  आहेत.  शपथपत्रात 5 लाखांच्या आत उत्पन्न असल्याचं त्यांनी नमुद केले आहे. त्यांनी घेतलेल्या फॉर्च्युनर आणि रेंज रोव्हर या कार प्रचंड महागड्या आहेत.  एवढं कमी उत्पन्न असलेला व्यक्ती इतक्या महागड्या कार कशा घेऊ शकतो? असे एक ना अनेक प्रश्न विचारून नेटकऱ्यांनी उदगीरकर यांना धारेवर धरलंय. तर वडिलांना गाडी गिफ्ट देणं चुकीचं आहे का असा सवाल उद्गीरकरांच्या मुलाने ट्रोलर्सना केला आहे. 

कोण आहेत नरसिंगराव उदगीरकर

1982 साली  नरसिंगराव उदगीरकर यांची उद्योग अधिकारी म्हणून उद्योग संचलनालय मुंबईमध्ये नियुक्ती झाली.  पदोन्नतीने त्यांना उपसंचालकपदी बढती मिळाली.  2012 साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन व्यवसाय सुरू केला.  दोन मुले मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिक आहेत.  

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणीची लोणावळ्यात सभा पार पडली. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत लोकसभेतील पराभवावर चर्चा करण्यात आली. तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धार यावेळी करण्यात आला.