तो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ!

Nagpur Crime News : एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते.

Updated: Sep 9, 2023, 05:25 PM IST
तो मृतदेह सना खानचा नाहीच; DNA रिपोर्टने समोर आल्याने खळबळ! title=
Nagpur Sana Khan Murder Mystery Case

Sana Khan Murder Case : नागपुरातील भाजपच्या नेत्या सना खान (Sana Khan Murder) यांच्या हत्याप्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपुरातील सना खान हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट (Murder Mystery) आलाय. गेल्या महिन्यात पोलिसांना सना खान यांच्याशी मिळताजुळता एक मृतदेह जबलपूरमध्ये (Jabalpur) आढळून आला होता. या मृतदेहाची डीएनए चाचणीचा (DNA Test) अहवाल आता आला असून त्यात निगेटिव्ह रीमार्क देण्यात आलाय. त्यामुळे तो मृतदेह सना खानचा नसल्याचे आता डीएनए रिपोर्टमुळे स्पष्ट झालंय. त्यामुळे आता पोलिसांचं (Nagpur Police) टेन्शन वाढल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता खुनाचा छडा लागणार तरी कधी? असा सवाल विचारला जात आहे. 

एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह (Sana Khan Murder Case) हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते. जबलपूर येथील सोफ्यावरील रक्ताचे डाग हे सना खान यांचेच असल्याचे डीएनए चाचणीत स्पष्ट झालंय. सना खान यांचा 2 ऑगस्टला आरोपी अमित साहू याने खून केला आणि तिचा मृतदेह हिरण नदी फेकला. त्यानंतर पोलिसांनी चौफेर चाचपणी केली मात्र, अद्याप मृतदेह हाती लागला नाहीये. 

सना खान हत्या प्रकरण आहे तरी काय?

त्याचं झालं असं की, 1 ऑगस्ट रोजी पश्चिम नागपूरमधील भाजपच्या स्थानिक नेत्या सना खान जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपसाठी गेल्या होत्या, तेव्हापासून त्यांचा पत्ता लागत नव्हता. हॉटेल व्यवसायिक अमित साहू उर्फ पप्पूसोबत त्यांची जुनी मैत्री होती. त्यांच्या नातेसंबंधावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. सना खान आणि अमित साहू यांचं एकेदिवशी कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे त्यांनी थेट जबलपूरचा रस्ता धरला होता. त्यांनी परिवाराला सुखरूप पोहोचल्याचं कळवलं. त्यानंतर त्यांचा फोन लागला नाही. कुटुंबियांनी चौकशी केली मात्र, त्यांचा पत्ता काही लागला नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यावेळी त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं. अमित साहू याने हत्या केल्याची कबुली दिली होती.

आणखी वाचा - कोकण रेल्‍वे गेटमन हत्या प्रकरणात मोठा खुलासा; मेहुण्यानेच झाडल्या गोळ्या

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. प्रत्येक टप्प्याचा मोगावा घेतला. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचा शोध सुरू केलाय. मात्र, अद्याप मृतदेह सापडला नाही. मृतदेहाची माहिती देणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलंय.