सुस्साट सुटलेल्या नागपूर मेट्रोला RDSO चा हिरवा कंदिल

एअरपोर्ट ते खापरी या मार्गावर धावण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वेला आरडीएसओ अर्थात 'रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्स ऑर्गनायझेशन'ने ग्रीन सिग्नल दिला आहे.

Updated: Dec 6, 2017, 12:05 AM IST
सुस्साट सुटलेल्या नागपूर मेट्रोला RDSO चा हिरवा कंदिल title=

नागपूर : एअरपोर्ट ते खापरी या मार्गावर धावण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वेला आरडीएसओ अर्थात 'रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्स ऑर्गनायझेशन'ने ग्रीन सिग्नल दिला आहे.

आरडीएसओची अवघड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता रेल्वे बोर्ड आणि सीएमआरएस यांच्या परीक्षेत मेट्रोला  उत्तीर्ण व्हायचे आहे. 

मात्र आरडीएसओच्या प्रमाणपत्रानंतर मेट्रोच्या कर्मिशिअल रनचा मार्ग लवकरत मोकळा होण्याचा मार्ग होईल. त्यामुळे नागपुरकरांना लवकरच मेट्रो सफरीचा आनंद लुटता येणार आहे.