मोठी बातमी | गणपतीपुळ्यात 3 तरुण बुडाले

पाण्याच्या वेगानं तिघांनाही नेलं पुढे जे घडलं ते धक्कादायक

Updated: Dec 19, 2021, 05:14 PM IST
मोठी बातमी | गणपतीपुळ्यात 3 तरुण बुडाले title=

रत्नागिरी: गणपतीपुळ्यामध्ये तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे तीन जण बुडाल्याची माहिती मिळाताच तातडीनं त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी एकाचा मृत्यू झाला तर दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 

तीन जण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली. तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित दोघांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दोन जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रत्नागिरीमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे तरुण दारूच्या नशेत होते त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.