हिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे

हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 13, 2017, 12:55 PM IST
हिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे title=

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे. 

तब्बल आठ मोर्चे येणार

सालाबाद प्रमाणे यंदाही हिवाळी अधिवेशनावर आजच्या दिवशी तब्बल आठ मोर्चे येणार आहेत. यापैकी राष्ट्रीय आदिम कृती समिती, राष्ट्रीय हलबा जमात महामंडळ, भटके व विमुक्त संघर्ष समिती हे प्रमुख राहणार आहेत. 

नावे जाहीर करण्याची मागणी

पहिले दोन दिवस अधिवेशनात विरोधकांनी याच मुद्यावर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज चालू दिले नव्हते. संपूर्ण कर्जमाफी केलेल्या शेतक-यांची नावे जाहीर करण्याची प्रमुख मागणी विरोधकांनी केलीय. आज याच मुद्यावरच विरोधक आज पुन्हा विधीमंडळात आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. 

कालच्या विरोधकांच्या मोर्चानंतर आज विधीमंडळावर हलबा समाजाचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चाही भव्य असेल अशी चर्चा नागपूरात आहे.