नागपुरात भाजपने जागा राखली, काँग्रेसवर मात

नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग ३५च्या पोटनिवडणुकीत भाजपने जागा राखली आहे. भाजपचे संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला. 

Updated: Oct 12, 2017, 02:19 PM IST
नागपुरात भाजपने जागा राखली, काँग्रेसवर मात title=

नागपूर : महानगर पालिकेच्या प्रभाग ३५च्या पोटनिवडणुकीत भाजपने जागा राखली आहे. भाजपचे संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला. 

पोटनिवडणूक लाईव्ह निकाल, करा इथं क्लिक

संदीप गवई यांना ५,७११ तर थोरात यांना ५,२४८ मते मिळाली. काल फक्त केवळ २४.३३ टक्के मतदानाची नोंदणी झाली होती. मतदान अत्यल्प झाल्याने निकाल कुणाच्या बाजूने लागतो याबद्दल राजकीय पंडितांमध्ये संभ्रम होता. या निवडणुकीत ७  उमेदवार रिंगणात होते.  तरी मुख्य लढत सत्ताधारी भाजप व कॉंग्रेस मध्येच होती. 

पाहा लाईव्ह निकाल, पाहण्यासाठी इथं करा क्लिक

राष्ट्रवादीने कॉंग्रेस उमेदवाराला समर्थन दिले होते. तर शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा केला नव्हता. भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महानगर पालिकेत यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत १५१ पैकी पक्षाचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. 

महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दोन महिन्यातच प्रभाग ३५ (अ) मधील भाजप नगरसेवक नीलेश कुंभारेंचं निधन झाले होते. त्यामुळे येथे निवडणूक लागली होती. पुन्हा ही जागा भाजपने काबीज केलेय.