कोल्हापुरात ताराराणी आघाडीचे यश, काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का

 महानगरपालिका पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २००  मतांनी विजयी झालेत. शहरातालील प्रभाग क्र. ११ ताराबाई पार्क इथं ही पोटनिवडणूक होती. बुधवारी मतदान पार पडलं होतं. काँग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करत ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी बाजी मारली आहे.

Updated: Oct 12, 2017, 02:11 PM IST
कोल्हापुरात ताराराणी आघाडीचे यश, काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का title=

कोल्हापूर : महानगरपालिका पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २००  मतांनी विजयी झालेत. शहरातालील प्रभाग क्र. ११ ताराबाई पार्क इथं ही पोटनिवडणूक होती. बुधवारी मतदान पार पडलं होतं. काँग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करत ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी बाजी मारली आहे.

पोटनिवडणूक लाईव्ह निकाल, करा इथं क्लिक

काँग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांना ११९९तर ताराराणी आघाडीचे शिरोळकर यांना १३९९ मतं मिळाली. यापूर्वी प्रभाग क्र. ११ ची ही जागा ताराराणी आघाडीकडेच होती. निकालानंतर ताराराणी आघाडीच्या समर्थकांनी जल्लोष केला.

पाहा लाईव्ह निकाल, पाहण्यासाठी इथं करा क्लिक

ताराराणी आघाडीचे तात्कालीन नगरसेवक नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यानंतर ही पोटनिवडणूक लागली होती. या निवडणूक निकालामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या संख्याबळात कोणताही बदल झालेला नाही.