Nagpur Accident: संकेत बावनकुळे 'त्या' ऑडीत होता, पोलीस तपासात मोठी माहिती समोर

Nagpur Audi Car Accident:  नागपूर ऑडी कार प्रकरणी पोलीस तपासात महत्वाची बातमी समोर आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 10, 2024, 12:41 PM IST
Nagpur Accident: संकेत बावनकुळे 'त्या' ऑडीत होता, पोलीस तपासात मोठी माहिती समोर title=
नागपूर ऑडी कार अपघात

Nagpur Audi Car Accident:  नागपूरच्या सीताबर्डी परिसरात रविवारी मध्यरात्री अपघात झाला होता. एका भरधाव ऑडी कारनं (Audi Car) दोन कार आणि एका बाईकला उडवल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या रोहित चिंतमवार यांच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पोलिसांनी यासंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट दिली आहे. 

पोलीस तपासात काय आलं समोर?

कारमध्ये अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार,  आणि संकेत बावनकुळे असे तिघेजण बसले होते.संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुन च्या बाजूला बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे.. अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते, अर्जुन वाहन चालवत होता, म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते म्हणाले.  

'संकेत बावनकुळे गाडीत होता हे सुरुवातीला स्पष्ट नव्हते'

संकेत बावनकुळे गाडीत होता हे सुरुवातीला आम्हाला स्पष्ट नव्हते मात्र नंतर तपासामध्ये संकेत बावनकुळे गाडीत होता हे स्पष्ट झाले आहे. अर्जुन आणि रोनीतला ताब्यात घेऊन आम्ही  चौकशी केली. तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता असं माहित पडलं. यानंतर काल रात्री त्याला बोलावून त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.हे तिघे लाहोरी हॉटेलमधून येत होते, अशी माहिती देखील देण्यात आली. 

आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सीसीटीव्ही डीलीट केले हे सत्य नाही.असे कुठे ही आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  

सुरुवातीला जेव्हा अपघात घडले आणि लोकांनी दोन कार आणि एक दुचाकी ला ऑडी कारची धडक बसली हे पाहिलं. याप्रकरणी त्या वाहनांमध्ये बसलेले जे लोक होते, ते किरकोळ जखमी होते. त्यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले होते, प्राथमिक उपचार करून तातडीने त्यांना डीसचार्ज देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.