Nagar Panchayat elections Result : सेना-भाजपला दे धक्का, राणेंची बाजी

 कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही पालिका निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झालेय. कोकणातील रणसंग्राम निकाल पाहा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2018, 11:07 AM IST
Nagar Panchayat elections Result : सेना-भाजपला दे धक्का, राणेंची बाजी   title=

मुंबई : कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही पालिका निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झालेय. या निवडणुकीत युती, आघाडी आणि भाजप विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगत आहेत. दरम्यान, कोकणात कणकवलीत नारायण राणे यांनी आघाडी घेत शिवसेना-भाजपला दे धक्का दिलाय. तर रत्नागिरीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चूरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. 

रत्नागिरीत गुहागर व देवरुख नगरपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेय. गुहागरमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना व शहरविकास आघाडी युतीमुळे निवडणूक प्रतिष्ठेची झालेय. येथे आमदार भास्कार जाधव यांची कसोटी आहे. तर देवरुखमध्ये भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दे धक्का देणार का? याची उत्सुकता आहे. तर कणकवलीत माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. मात्र, त्यांनी शिवसेना आणि भाजपला जोरदार धक्का देत आपलीच सत्ता असल्याचे दाखवून दिलेय.

रत्नागिरीतील निकालाचे चित्र

 गुहागर नगरपंचायत  

एकूण जागा -17   

जाहीर निकाल -17

भाजप - 06

राष्ट्रवादी- 01

शहर विकास आघाडी- 09

शिवसेना - 01

गुहागर नगरपंचायत शहर विकास आघाडीकडे, भास्कर जाधव यांना धक्का

गुहागर नगरपंचायत निवडणुक मतमोजणी सुरु 

एकुण जागा -17   

जाहीर निकाल -06

भाजप - 03

राष्ट्रवादी- 01

शहर विकास आघाडी- 02

शिवसेना - 00

रत्नागिरी नगर परिषद पोटनिवडणुक

शिवसेनेचे राजन शेट्ये विजयी

गुहागर -गुहागर नगरपंचायत निवडणुक मतमोजणी सुरु 

पहिली फेरी मत मोजणी 

नगराध्यक्ष - मत मोजणी आघाडी 
राष्ट्रवादी -दीपक कनगुटकर - 621
भाजप - रविंद्र  बागाकर-612
शहर विकास आघाडी- राजेश बेंडल -668

देवरुख नगर पंचायत 
पहिल्या ६ प्रभागांचा निकाल 

भाजप ३ 
सेना २ 
राष्ट्रवादी १

गुहागर - नगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये शहरविकास चे राजेश बेंडल आघाडीवर.

गुहागर -गुहागर नगरपंचायत निवडणुक मतमोजणी सुरु 

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव व भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची प्रतिष्ठापणाला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निकाल चित्र

- भाजपला धक्का राणेंनी मारली बाजी जाहीर निकाल

स्वाभिमान ८
राष्ट्रवादी १
शिवसेना २
भाजप २

स्वाभिमानाचे समीर नलावडे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार १३३ मतांनी पुढें