राज्यातील पालिका निवडणूक निकालाकडे लक्ष, राणे-महाजन-जाधव यांची प्रतिष्ठापणाला

महाराष्ट्र राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही पालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 12, 2018, 07:45 AM IST
राज्यातील पालिका निवडणूक निकालाकडे लक्ष, राणे-महाजन-जाधव यांची प्रतिष्ठापणाला title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. मात्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही पालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत युती, आघाडी आणि भाजप विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगत आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. तर रत्नागिरीत गुहागर व देवरुख नगरपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेय. गुहागरमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे शिवसेना व शहरविकास आघाडी युतीमुळे निवडणूक प्रतिष्ठेची झालेय. येथे आमदार भास्कार जाधव यांची कसोटी आहे. तर देवरुखमध्ये भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस दे धक्का देणार का? याची उत्सुकता आहे. तर कणकवलीत माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची प्रतिष्ठापणाला लागलेय. तर जामनेरमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची कसोटी आहे.

गिरीश महाजन यांची खरी कसोटी

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह २१ जागांसाठी आज मतमोजणी आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच्या सर्व २१ जागांचे निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. ७१ टक्के मतदान या निवडणुकीत झालं असून नगराध्यक्षपदासाठी भाजपातर्फे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून  प्रा. अंजली पवार यांच्यात प्रमुख लढत आहे. शिवसेनेनं चार उमेदवार रिंगणात उतरवलेत. अतिशय अटीतटीच्या लढतीत गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

राणेंचा करिष्मा चालणार का?

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु होणार आहे.  कणकवली तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार असलेल्या नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजपात ही लढत होत असल्याने या लढतीकडे विशेष लक्ष लागून राहिलंय.  या निवडणुकीत संदेश पारकर यांचे भवितव्य पणाला लागलं असून आमदार नितेश राणे यांच्यासाठी देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत राणे बाजी मारतात की भाजप याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. 

रत्नागिरीकडे विशेष लक्ष

रत्नागिरी : गुहागर आणि देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय. गुहागरमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस त्याप्रमाणे शिवसेना-शहरविकास आघाडी युती आहे.नगरपंचायत क्षेत्रात प्रत्येक प्रभागात १ याप्रमाणे १७ प्रभागांमध्ये मतदान केंद्रे होती. निवडणुकीला ५ हजार ८३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार बजावला. गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा खर तर या ठिकाणी पणाला लागली आहे.ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण १७ केंद्रावर मतदान प्रक्रिया झाली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देवरूख निवडणूक विभाग व देवरूख पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीसाठी संपूर्ण देवरूख शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

नगराध्यक्ष पदाकरिता हे उमेदवार

नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेस - राष्ट्रवादी - बहुजन विकास आघाडी - कुणबीसेना व जनता दल या पक्षांच्या आघाडीकडून स्मिता लाड, भाजपा- मनसे - आरपीआय या युतीच्या मृणाल शेट्ये, शिवसेनेकडून धनश्री बोरूकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मिताली तळेकर व अपक्ष म्हणून अनघा कांगणे असे ५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत तर नगरसेवक पदासाठी ६१ उमेदवार उभे आहेत.