Mumbai Puen Water Cut: पाणी जपून वापरा! मुंबई- पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Mumbai Pune Water Cut: सर्वसामान्यांचा कामाची बातमी, पालिकेकडून जलवाहिन्यांसंदर्भात काम हात घेण्यात येणार असून येत्या बुधवार आणि गुरुवारी या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासूनच पाण्याचा साठा करुन ठेवा आणि पाणी जपून वापरा. 

Updated: Mar 1, 2023, 06:48 PM IST
Mumbai Puen Water Cut: पाणी जपून वापरा! मुंबई- पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद title=
Mumbai Water Supply And Pune Water Supply News 3 March which areas will the water supply be shut off todays latest marathi news

Mumbai And Pune Water Cut News: पाणीपुरवठा बाबत महत्त्वाची बातमी...पुणेकर (Pune news) आणि मुंबईकर (Mumbai news)  ही बातमी तुमच्या कामाची आहे. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कारण पालिकेकडून जलवाहिन्यांसंदर्भात काम केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आतापासून पाणी जपून वापरा. पुण्यात आणि मुंबईत कुठल्या भागात आणि कधी पाणी पुरवठा नसणार आहे ते जाणून घ्या. (Mumbai Water Supply And Pune Water Supply News 3 March which areas will the water supply be shut off todays latest marathi news)

मुंबईतील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांनो 2 मार्च म्हणजे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबईतील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुपमधील काही परिसरांमध्ये 2 मार्चला मध्यरात्रीपासून 3 मार्चला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  पालिकेने एस आणि एन विभागातील दुरुस्तीचं काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुण्यातील 'या' दिवशी नसणार पाणी

पुण्यातील रामटेकडी ते खराडी भागात पालिकेकडून जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी 2 मार्चला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी 3 मार्चला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पुणेकरानो पाणी जपून वापरा. 

'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार

रामटेकडी ,ससाणे नगर ,हडपसर गावठाण, फुरसुंगी, सातव वाडी मगरपट्टा, वानवडी, केशवनगर मुंढवा गाव, गाडीतळ अशा मुख्य भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.