Sachin Waze On Anil Deshmukh: महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. सचिन वाझेंने अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिले आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असे आरोप वाझेने केले आहेत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Dismissed Mumbai police officer and accused in Rs 100 crore extortion case, Sachin Waze says, "Whatever has happened, the proof is there. The money used to go through his (Anil Deshmukh) PA, CBI has the proof and I have also written a letter to… pic.twitter.com/Y3MidoPDME
— ANI (@ANI) August 3, 2024
जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले. याचे सीबीआयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत.सचिन वाझे हे 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहेत.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे अशी विधाने निवडणुकांवर नक्कीच परिणाम करणारे आहेत. अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप याआधी झाले होते. यात आता सीबीआयकडे पुरावे असल्याचे सचिन वाझेंनी म्हटलंय. सचिन वाझे हे जामिनावर बाहेर आहेत. यात त्यांनी आता जयंत पाटलांचे नाव घेतले आहे. सचिन वाझे सांगत असलेले पुरावे काय आहेत? ते कधी आणि कशाप्रकारे बाहेर येणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडचणी यामुळे वाढताना दिसताय.