खंडाळा घाटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर

डिसेंबर महिन्यात खुला होणारा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता प्रकल्पाचे लोकार्पण थेट  पुढच्या वर्षीच होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 24, 2024, 04:14 PM IST
खंडाळा घाटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर title=

Mumbai Pune Expressway Missing Link : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे.  डिसेंबरला सुरु होणारा मिसिंग लिंक प्रकल्प मार्च 2025 ला खुला होणार आहे.  पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. 

 या मार्गामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीनं कमी होणारेय तसंच प्रवाशांची लोणावळा घाटातूल वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते. प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन एमएसआरडीसीनं केलंय.खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येतायत. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा आहे. या दोन्ही बोगद्यांची 98 टक्के कामं पूर्ण झाले आहे. 

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याची अंतिम मुदत आता मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र हा मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे. एकूण 14 किलोमीटर चा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलाचे अवघे 900 मीटर अंतर पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे डिसेंबर 2024 ला नागरिकांच्या सेवेत येणाऱ्या हा मिसिंग लिंक मार्च 2025 ला खुला होणार आहे. 

खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. 2025 मध्ये पूर्ण झाल्यानंतर या दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. खंडाळा खोऱ्यात मिसिंग लिंकचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...