Measles Outbreak : मुंबईनंतर मालेगावातही गोवरचं थैमान, 44 लहान मुलांना झाली लागण

Measles Outbreak : मुंबई  पाठोपाठ नाशिक आणि मालेगावातल्या लहान मुलांना गोवरची बाधा होऊ लागलीये ( Measles Outbreak in MaharashtraMeasles Outbreak in Maharashtra).

Updated: Nov 17, 2022, 01:15 PM IST
Measles Outbreak : मुंबईनंतर मालेगावातही गोवरचं थैमान, 44 लहान मुलांना झाली लागण title=

Measles Outbreak in Maharashtra​ : राजधानी मुंबईत सुरू झालेली गोवरची (Measles) साथ आता राज्यभरात पसरतेय. मुंबई (Mumbai) पाठोपाठ नाशिक (Nashik) आणि मालेगावातल्या (Malegaon) लहान मुलांना गोवरची बाधा होऊ लागलीये. त्यामुळं महापालिका यंत्रणा खडबडून जागी झालीये. 

मुंबई-मालेगावात गोवरचा कहर 

  • मुंबईत आतापर्यंत 7 बालकांचा गोवरमुळं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
  • तर तब्बल 61 हून अधिक मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • मालेगावात 44 लहान मुलांना गोवरच्या आजाराची लागण झालीये
  • धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत तब्बल 20 हजार मुलांचं गोवर लसीकरण झालेलं नाही
  • तर मालेगावातही हजारो मुलं लसीकरणापासून वंचित असल्याची चिंताजनक बाब निदर्शनास आलीय.

गोवर नियंत्रणासाठी मालेगावचे महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेतली. लसीकरणावर भर देण्याच्या सूचना त्यांनी पालिका आरोग्य यंत्रणेला दिली.

गोवरची साथ लक्षात घेता पालकांनीच आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी.

कशी घ्याल मुलांची काळजी? 

  • गोवर संरक्षणासाठी लहान मुलांना लसीचे 2 डोस द्या
  • ताप, खोकला, सर्दी, लाल डोळे अशी गोवरची लक्षणे आहेत
  • मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसल्यास तातडीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू करा
  • गोवरग्रस्त मुलांना इतर लहान मुलांपासून दूर ठेवा
  • पाणी आणि फळांचा रस पिण्यास द्या, असा सल्ला डॉक्टर देतात.

लस घेतलेल्या बालकांना गोवरची बाधा होण्याचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. पण जनजागृतीचा अभाव आणि पालिकांची उदासीनता यामुळे गोवर लसीकरण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. लहान मुलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्याची गरज आहे.