मुंबई : महाराष्ट्रासाठी येणारे काही दिवस महत्वाचे आहेत, ऍक्टीव म्हणजेच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण येत्या ११ दिवसांत ३ लाखांवर जाण्याचा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवला जात आहे, दर आठवड्याला सरासरी रुग्णसंख्येत १ टक्क्यांनी वाढ होत आहे, यावरूनच हा अंदाज देण्यात आलाय. याशिवाय कोरोनाबाधितांचा मृत्यू दर ही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, सध्या राज्यात २ लाख ४७ हजार २९९ ऍक्टीव्ह रुग्ण आहेत, तर ५३ हजार ६८४ मृत्यू झाले आहेत.
मुंबईत आज कोरोनाचे 5 हजार 504 नवे रुग्ण, तर 14 मृत्यूंची संख्या आहे.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 987 कोरोना बाधित रुग्णांची नों झाली आहे. उपचार घेत असलेले एकूण रुग्ण 6671 आहेत. तर 24 तासात कोरोना बाधित 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कल्याण पूर्व - 154 ,कल्याण पश्चिम - 330
डोंबिवली - 316 ,डोंबिवली पश्चिम - 110
मांडा टिटवाळा - 57 ,मोहने - 17 ,पिसवली - 2
रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 521 नवे रुग्ण सापडलेत. दिवसा अखेर ऍक्टिव्ह रुगणांची संख्या 3 हजार 167 तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात कोरोनाचा कहर वाढतच चाला आहे. गेल्या 24 तासात नागपूर शहरात 33 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 3 हजार 579 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
अहमदनगरमध्ये आज एकूण रूग्ण संख्या 88084 आहे, तर नवे 1338 रुग्ण वाढले आहेत.
उपचार सुरू असलेले एकूण 4799 रूग्ण तर बरे झालेल्यांची रुग्ण संख्या 82096 आणि एकूण 1189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नांदेडमध्ये कोरोनामुळे इतकी भयानंक परिस्थिती निर्माण झाली आहे की अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत लाईन लागली आहे. नांदेडमध्ये आज सकाळपासून कोरोनामुळे १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लोखंडी स्टँड कमी असल्याने स्मशानभूमीच्या आवारात खालीच सरण रचून अंत्यसंस्कार करावे लागले. कोरोनामुळे नांदेड जिल्ह्यात गेल्या ६ दिवसात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशाच्या कोरोना रुग्ण संख्येचा विचार करायचं झालं तर रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देश भरात एकूण 53 हजार 476 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 251 कोरोना ग्रस्तांचा बळी गेला आहे. तर सध्या कोरोनाचे 3 लाख 95 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्य 1 कोटी 17 लाख 87 हजारांवर पोहोचलीय. यात 1 कोटी 12 लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहे.