APMC Election Result : मुंबई कृषी बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  Mumbai Agriculture Produce Marketing Committee (APMC) निवडणुकीचा निकाल.  

Updated: Mar 2, 2020, 01:57 PM IST
APMC Election Result : मुंबई कृषी बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी title=

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  Mumbai Agriculture Produce Marketing Committee (APMC) निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अशोक वाळुंज यांनी विजयाची हॅ्टट्रीक केली आहे. महाविकास आघाडीने आघाडी घेत बाजी मारली आहे. कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळूंज विजयी झाले आहेत. ते कांदा बटाटा मार्केट संचालकपदी सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची बाजी मारली आहे. भाजपला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आलेले नाही. याआधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे यश होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यात आली आणि यात त्यांना पुन्हा यश मिळाले आहे. महाविकास आघाडीचे  अशोक वाळुंज , संजय पानसरे , शंकर पिंगळे , राजेंद्र पाटील हे विजयी उमेदवार झाले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सरशी झाल्यानंतर एकज जल्लोष साजरा करण्यात आला आहे. बाजार समितीच्या पाच बाजार पेठामधून व्यापारी प्रतीनेधी निवडून आलेत. यात  राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजीपाला मार्केटमधून शंकर पिंगळे,  कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळुंज आणि फळ मार्केटमधून संजय पानसरे यांचा विजय झाला आहे. तसेच धान्य मार्केटमधून नीलेश वीरा, मसाला मार्केटमधून विजय भुता हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. यांच्या विजयानंतर महाविका आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विजय साजरा केला.

पुणे महसूल विभाग विजयी उमेदवार

महाविकास आघाडीचे धनंजय वाडकर, बाळासाहेब सोळस्कर  

कोकण महसूल विभाग विजयी उमेदवार

महावीकस आघाडीचे राजेंद्र पाटील आणि अपक्ष प्रभू पाटील विजयी

0