नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती Mumbai Agriculture Produce Marketing Committee (APMC) संचालक पदासाठी आज मतमोजणी होत आहे. देशातील सर्वात मोठी कृर्षी उत्पन्न बाजार समिती असलेल्या मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीवर (Mumbai Market Committee Elections) कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजप आपला करिष्मा दाखवणार का, याचीही चर्चा सुरु झाली आहे.
#BreakingNews । मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदासाठी आज मतमोजणी । देशातील सर्वात मोठी कृर्षी उत्पन्न बाजार समिती असलेल्या मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली । आज निकाल लागणार आहे.https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/vYRhGDd46d
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 2, 2020
मुंबई कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. राज्याच्या एकूण ३४ जिल्ह्यांमध्ये यासाठी मतदान झालं. कांदा बटाटा मार्केट, भाजी मार्केट, मसाला मार्केट आणि धान्य मार्केटच्या संचालकपदासाठी ही निवडणूक आहे. माजी संचालकांसह अनेक दिग्गज व्यापारी निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यामुळे आता अंतिमतः निवडणुकीच्या मैदानात कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे.
महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) विरूध्द भाजप (BJP) अशी सरळ लढत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांशी निघडीत असलेल्या कृर्षी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. बाजार समितीवर विशेषता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. हे पाहता बाजार समितीच्या निवडणूकीला भाजपने गेली पाच वर्ष स्थगिती दिली होती. मात्र आता आघाडी सरकार येताच ही स्थगिती उठवण्यात आली आहे.
मुंबई कृर्षी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai Agriculture Produce Marketing Committee)एकूण १८ संचालक राज्यभरातून निवडून जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक महसूल विभागातून दोन शेतकरी प्रतिनिधी असे १२ शेतकरी संचालक, वाशीच्या एपीएमसीमधून पाच व्यापारी संचालक आणि एक माथाडी कामगार युनियनमधून कामगार संचालक निवडून जाणार आहेत. दोन संचालक या आधीच बिनविरोध निवडून आल्याने आज १६ संचालकांचा निकाल लागणार आहे.