MPSC मायाजाल आहे, यात पडू नका!, आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र

एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झाल्यानंतरही  नोकरी न मिळाल्यानं  स्वपनील लोणकर (Swapnil Lonkar) या 24 वर्षीय तरुणाने  गळफास घेत आत्महत्या केली. 

Updated: Jul 4, 2021, 03:31 PM IST
 MPSC मायाजाल आहे, यात पडू नका!, आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र title=

पुणे :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात एका 24 वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. फुरसुंगीजवळच्या गंगानगर इथे ही घटना घडली. (MPSC is magic don't fall into it  a heartbreaking letter written by Swapnil before committing suicide)

स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) असं या तरुणाचं नाव आहे. स्वप्नीलने अथक परिश्रम घेऊन एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली, पण दीड वर्ष उलटूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती.  अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

स्वप्नील एमपीएससीच्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षापासून त्याची मुलाखत झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला.

कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. यामुळे स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. घरची बेताची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. आणि त्यातून त्याने आपलं जीवन संपण्याचा निर्णय घेतला. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या स्वप्निलने सुसाईड नोटच्या सुरुवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असं म्हटलं आहे.

स्वपनीलचं मन हेलावून टाकणारं पत्र

 

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर राजकीय प्रतिक्रिया

एमपीएससीने कार्यपद्धतीचं अवलोकन करावं अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. एमपीएससीला स्वायत्तता असली तरी त्यांनी स्वैराचाराने वागू नये अशी फडणवीसांनी सुनावलंय.

एमपीएससीची परीक्षा तातडीने घेण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केलीय. तर मंत्रिमंडळाची बैठक आहे त्यात सगळे मुद्दे चर्चेत येतील असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या : 

बालभारतीची पाठ्यपुस्तके लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार!