वृक्षलागवडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल, काम जेसीबीने कागदावर मजुरांकडून

  चार कोटी वृक्षलागवडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब पुढे आलेय. काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात हे काम मजुरांच्यामाध्यमातून करण्यात आल्याचे दाखविण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. 

Updated: Dec 19, 2017, 12:07 PM IST
वृक्षलागवडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल, काम जेसीबीने कागदावर मजुरांकडून title=

कोल्हापूर :  चार कोटी वृक्षलागवडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब पुढे आलेय. काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात हे काम मजुरांच्यामाध्यमातून करण्यात आल्याचे दाखविण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. 

दशलक्ष कोटींचा भ्रष्टाचार?

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातल्या चार कोटी वृक्षलागवडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झी मीडियानं केली होती. वनखात्यानं यात भ्रष्टाचार केला. त्यामुळं वनखात्याची दशलक्ष कोटींची योजना म्हणजे दशलक्ष कोटींचा भ्रष्टाचार म्हणावा लागेल, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. 

झाडांसाठीचे खड्डे जेसीबीच्या सहाय्यानं

मतदार संघात फिरताना झाडांसाठीचे खड्डे जेसीबीच्या सहाय्यानं केले जात असल्याचं आपण पाहिलं. पण कागदोपत्री मात्र हे खड्डे मजुरांकरवी केल्याचं दाखवल्याचं पाहून धक्का बसल्याची बाबही शेट्टींनी निदर्शनाला आणून दिली.