आताची मोठी बातमी! विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्याच्या हालचाली, भाजपचे 'हे' नेते सुप्रीम कोर्टात जाणार

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार 

Updated: Aug 10, 2022, 10:10 PM IST
आताची मोठी बातमी! विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्याच्या हालचाली, भाजपचे 'हे' नेते सुप्रीम कोर्टात जाणार title=

सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : पंढरपूरचं विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Mandir) शासनमुक्त करण्यासाठी भाजप नेते डॉ सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी कंबर कसली आहे. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सरकारमुक्त करण्यासाठी स्वामी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. यासाठी लवकरच ते पंढरपूरला येणार असल्याची माहिती आहे.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी वारकरी संप्रदायातील महाराजांची नुकतीच भेट घेतली. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी ते लवकरच पंढरपूरलाही भेट देणार आहेत. डॉ सुब्रमण्यम स्वामी यांची कायदेतज्ज्ञांची टीम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिराबरोबरच सर्व हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ते पावलं उचलत आहेत.

विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल 35 कोटींच्या आसपास असली तरी विठुरायाच्या दर्शनाला वर्षभरात दीड कोटी भाविक येत असल्याने हे देवस्थान ताब्यात घेण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ लागते. समिती अध्यक्षपद सध्या रिक्त असून सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांच्याकडे कार्यभार आहे.