Pune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण...

Mountaineer Swapnil Gard passed away: एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांच्या हातात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, काळाने घात केला...

सौरभ तळेकर | Updated: Jun 8, 2023, 03:39 AM IST
Pune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण... title=
Mountaineer Swapnil Gard passed away after climbing Mount Everest

Swapnil Garad: आकाशाला भेदून टाकणारा, जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर पुणे पोलीस दलातील कर्मचारी गिर्यारोहक स्वप्नील गरड (Swapnil Garad) यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच स्वप्नील गरड यांनी माउंट एव्हरेस्टवर यशस्वीपणे चढाई केली होती. भल्या मोठ्या एव्हरेस्टवर स्वप्नील गरड यांनी तिरंगा फडकविला होता. मात्र हा आनंद त्यांना जास्त वेळ टिकवता आला नाही. एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. माऊंट एव्हरेस्टवर ब्रेन डेड (Brain Dead) झाला होता. त्यानंतर त्यांना काठमांडूतील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत स्वप्नील गरड कार्यरत होते. पुण्यातील केशवनगर भागात ते वास्तव्यास होते. माऊंट अमा दाब्लाम मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर लगेच जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट मोहिमेच्या तयारीला स्वप्नील लागले होते. एकूण ६ हिमशिखरे पादाक्रांत केली होती. या शिखरांपैकी माऊंट युनम, माऊंट हनुमान तिब्बा, माऊंट लाखोकांन्तसे आणि माऊंट अमा दबलम या शिखरांचा समावेश होता. एवढी मोठी कामगिरी सर करणारे ते महाराष्ट्र पोलीस दलातील ते पहिलेच पोलिस कर्मचारी होते.

नेमकं काय झालं?

शिखर माथ्यापासून बेस कॅम्प येताना थकल्यासारखं जाणवललं. त्यामुळे त्यांनी कॅम्प 3 इथं मुक्काम करायचं ठरवले आणि त्या रात्रीने घात झाला. उंचीवर खाली येताना होणारी वेगवान हालचाल, बोचरे वारे, प्रचंड थंडी या सगळ्याचा स्वप्नील यांच्या शरीरावर परिणाम झाला आणि अतिउंचीवरील गंभीर आजारांनी ( High Altitude Cerebral Odema - HACO & High Altitude Pulmonery Odema - HAPO) भयंकररीत्या ग्रासलं. या आजारामध्ये मेंदू आणि फुफ्फुसात पाणी तयार होऊन त्याद्वारे संसर्ग वाढत जातो. अत्यंत महत्वाचे दोन्ही अवयव निकामी होऊ लागतात.

हेलिकॉप्टर रेसक्यू करून काठमांडू येथील प्रगत अत्याधुनिक अश्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि पुढचे उपचार सुरू करण्यात आले पण काही वेळातच ब्रेन डेड म्हणून जाहीर करण्यात आलं आणि 7 जून रोजी स्वप्नील गरड यांची प्राणज्योत मावळली. कर्तव्यदक्ष, संयमी, शांत स्वभावाचा आणि सदैव हसतमुख असा स्वप्नील यांचा स्वभाव होता. मात्र त्यांच्या जाण्याने एक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि दोन मुले आहेत.

मागील काही वर्षात माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहकांची रीघ लागल्याचं दिसून येतंय. त्यामुळे एव्हरेस्टवरचं ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी होतात पण अनेक गिर्यारोहकांचा खाली उतरताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना दिसून येतात. जायन्ट अशा एव्हरेस्टवरुन खाली उतरताना मोठी कसरत होते. शारीरिक वेदना आणि उत्साहाच्या भरात रक्ताभिसरण प्रक्रिया मंदावते आणि कालांतराने मेंदू थकत जातो. याचे शरीरात आणि मेंदूवर परिणाम होतात.

आणखी वाचा - आषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान, एव्हरेस्ट सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांच्या हातात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. महाराष्ट्रातील शिवरायांच्या एका पर्वतप्रेमी मावळ्याने पर्वतांच्या कुशीतच शेवटचा श्वास घेतला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.