मुंबई : आजच्या आताच्या 5 महत्वाच्या बातम्या. ओमायक्रॉनचा धोका जगभर वाढत असताना मुंबईतून अत्यंत महत्वाची बातमी. तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना लसीकरणाबाबत पत्र लिहिले आहे. यासारख्या आज महत्वाच्या 5 बातम्या आपण आज पाहणार आहोत.
- कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन कमी घातक
- व्हेरियंटचा शोध लावणा-या डॉक्टरचाच दावा
- प्रसारवेगामुळे मात्र काळजी आवश्यक
- बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी
- भारतात ओमायक्रॉनचे 23 रुग्ण आढळले (Omicron | ओमायक्रॉनपासून लहान मुलांना सांभाळा)
- मुंबई महापालिका करणार ओमायक्रॉनच्या निदानासाठी टेस्टिंग कीटची खरेदी
- मुंबईतील कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात लवकरच येणार टेस्टिंग कीट
- जिनोम सिक्वेसिंग टेस्टसाठी टेस्टिंग कीटची खरेदी...
- टेस्टिंग कीटमुळे निदानाचा वेग वाढणार...
ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेता जिनोम सिक्वेसिंग टेस्टींग किट मुंबई महानगरपालिका खरेदी करणार आहे. यासाठी निविदा काढण्यात .येणार असून, कस्तुरबा आणि केईएम हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी सुमारे आठशे किट लवकरच उपलब्ध होणार आहे. बाहेरून येणा-या प्रवाशांमध्ये ओमायक्रॉनचं निदान लवकर व्हावं यासाठी हे कीट महत्वाचं आहे.
कॅबिनेटची आज दुपारी साडे बारा वाजता बैठक होत आहे. सह्याद्री गेस्टहाऊसमध्ये ही बैठक होणार आहे. राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाला सर्वोच्य न्यायालय स्थगिती दिली आहे. त्यानंतरची ही पहिलीच कॅबिनेट बैठक आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे मंत्री हा मुद्दा कॅबिनेटमध्ये छेडणार असल्याची माहिती मिळेतय. त्यामुळे ही कॅबिनेट वादळी ठरण्याची शक्यता आहे. (OBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट)
- लसीकरणाचं वय 18 ऐवजी 15 करा- आदित्य
- फ्रंटलाईन वर्कर्सना लसीचा तिसरा डोस द्या- आदित्य
- दोन डोसमधील अंतर 4 आठवडे ठेवा- आदित्य
आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांना पत्र लिहिलंय. लसीकऱणाचं वय घटवा तसंच फ्रंटलाईन वर्कर्सना तिसरा डोस देण्याची मागणी त्यांनी केलीय. (पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं केंद्राला पत्र, लसीकरणाबाबत केली 'ही' मागणी)
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर केंद्र सरकारची आंदोलक शेतक-यांच्या अन्य मागण्यांबाबतही सकारात्मक भूमिका, आंदोलन मागे घेण्याबाबत आज निर्णयाची शक्यता
भारतीय वंशाचे अनिल मेनन चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, नासाचं मिशन मून लवकरच