मुंबई : राज्यात एकीकडे विठूमाऊलीचा गजर सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी कर्जमाफीबद्दल उपस्थित केलेल्या संशयांना जोरदार उत्तर दिलं आहे. राज्यातल्या ३६ लाखांहून अधिक शेतक-यांचा सातबारा कोरा होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरवर केला आहे
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची आकडेवारी खोटी असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा निहाय कर्जमुक्तीच्या लाभार्थींची आकडेवारी जाहीर केली. यादीनुसार सर्वाधिक लाभार्थी बुलडाणा जिल्ह्यात असून त्या खालोखाल यवतमाळ जिल्हात सरकारी कर्जमुक्तीच्या योजनेचे लाभार्थी आहेत. विशेष म्हणजे मुंबई उपनगरातल्या ११९ शेतक-यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.