उल्हासनगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आयुक्तांचे आदेश

महापालिकेत काही कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Updated: Jul 4, 2017, 01:38 PM IST
 title=

उल्हासनगर : महापालिकेत काही कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 मालमत्ता कराच्या पावत्या ह्या जास्तीत जास्त मालमत्ताधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर पालिकेने या पावत्या वाटण्याचं काम महिला बचत गटांना दिलं होते. अवघ्या काही दिवसांत ६० टक्के काम बचत गटांनी पूर्ण केले. आयुक्तांनी या कामाचं कौतुक केले.

मात्र, उर्वरित पावत्या पोहोचवण्यात बचत गटांना अडचणी येत आहेत. यात कर निरीक्षक मदत करत नसल्यानं १२ कर निरिक्षक आणि १५ लिपिकांचे पगार थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कर विभागातल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.