देशातील शेतक-यांचा सातबारा कोरा करुन कर्जमाफी द्यावी - राजू शेट्टी
ऊस उत्पादक शेतक-यांना चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी चौतिसशे रुपये देण्यात यावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेत केली आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ही ऊस परिषद पार पडली.
Oct 29, 2017, 02:55 PM IST३६ लाखांहून अधिक शेतक-यांचा सातबारा कोरा होईल - मुख्यमंत्री
राज्यात एकीकडे विठूमाऊलीचा गजर सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी कर्जमाफीबद्दल उपस्थित केलेल्या संशयांना जोरदार उत्तर दिलं आहे. राज्यातल्या ३६ लाखांहून अधिक शेतक-यांचा सातबारा कोरा होईल असा दावा मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरवर केला आहे
Jul 4, 2017, 01:46 PM IST