मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे

मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये गारपिट आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पुढचे ४८ तास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी तसंच नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 12, 2018, 03:52 PM IST
मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे title=

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये गारपिट आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पुढचे ४८ तास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी तसंच नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 

आणखी पावसाचा अंदाज

रविवारी वादळी वा-यांसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतक-यांना त़डाखा दिला होता. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं होतं. आता सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशीही वादळी वा-यांसह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तेव्हा शेतक-यांनी सावध राहिले पाहिजे. 

पिकांची काळजी

पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करणे आवश्यक आहे. विशेषत: वादळी वारे वाहत असतांना नागरिकांनीही सुरक्षित ठिकाणी थांबणे आवश्यक आहे. कारण रविवारी वीज पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही घडल्या होत्या.