मुंबई : पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी (Monsoon Update 2022) गूड न्यूज आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सून उद्यापर्यंत अरबी समुद्रात पोहचण्याची शक्यता आहे. तर आज मान्सून संपूर्ण श्रीलंका व्यापण्याचा अंदाज आहे. नियोजित वेळेपेक्षा 6 दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. (monsoon update 2022 heavy rainfall forecast for konkan coast)
कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात काल संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. ऊसासह सर्वच पिकांना वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. कागल तालुक्यातील बानगे इथल्या शेतकऱ्याचा दीड एकर ऊस वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाला आहे.
तसेच मुसळधार पावसामुळे सांगलीतील दुष्काळी जतमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. तर कोल्हापुरात ऊस आडवा झाला. पंढरपुरात वादळी वाऱ्यानं केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. तसेच बेदाण्याचंही नुकसान झालं. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करुन नयेत, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केलं आहे.