मुंबई : सध्या सर्व स्तरावर कोरोनाशी युद्ध सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने महाराष्ट्रात प्रवेश केला. तेव्हापासून राज्य कोरोनाशी दोन हात करत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही १२,९७४ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
मे महिन्याला सुरूवात झाली की साऱ्यांना वेध लागतात ते पावसाचे. पण मुंबईकरांना यंदा कोरोना पाठोपाठ पावसाची देखील चिंता आहे. पावसा अगोदर नाले, गटारांची, रस्त्याची दुरूस्ती करूनही थोड्याशा पावसातही मुंबई तुंबते. अशावेळी यंदा मुंबईत कोणतंच हवं तसं काम झालेलं नाही. अशावेळी मुंबईकरांनी येणाऱ्या पावसाला देखील सामोरं जायचं आहे.
मे महिना उजाडला की जून-जुलै- ऑगस्टमधील पावसाळ्याचे वेध सुरू होतात. समुद्राच्या उधान भरतीच्यावेळी जर जोराचा पाऊस झाला तर मुंबई सारख्या शहरात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. समुद्राला जून-जुलै - ऑगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त भरती येणार असलेले दिवस, वेळ व समुद्राच्या पाण्याची उंची पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे. देण्यात आलेली उंची ही लाटेची नसून भरतीच्या पाण्याची आहे यांची नोंद घ्यावी असेही श्री. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
१) गुरुवार ४ जून सकाळी १०-५७ पाण्याची उंची ४.५६ मीटर.
२) शुक्रवार ५ जून सकाळी ११-४५ पाण्याची उंची ४.७५ मीटर.
३) शनिवार ६ जून दुपारी १२-३३ पाण्याची उंची ४.८२ मीटर.
४) रविवार ७ जून दुपारी १-१९ पाण्याची उंची ४.७८ मीटर.
५) सोमवार ८ जून दुपारी २-०४ पाण्याची उंची ४.६७ मीटर.
६) मंगळवार ९ जून दुपारी २-४८ पाण्याची उंची ४.५० मीटर.
७) मंगळवार २३ जून दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.५२ मीटर.
८) बुधवार २४ जून दुपारी २-२५ पाण्याची उंची ४.५१ मीटर.
९) शनिवार ४ जुलै सकाळी ११-३८ पाण्याची उंची ४.५७ मीटर.
१०) रविवार ५ जुलै दुपारी १२-२३ पाण्याची उंची ४.६३ मीटर.
११) सोमवार ६ जुलै दुपारी १-०६ पाण्याची उंची ४.६२ मीटर.
१२) मंगळवार ७ जुलै दुपारी १-४६ पाण्याची उंची ४.५४ मीटर.
१३) मंगळवार २१ जुलै दुपारी १२-४३ पाण्याची उंची ४.५४ मीटर.
१४) बुधवार २२ जुलै दुपारी १-२२ पाण्याची उंची ४.६३ मीटर.
१५) गुरुवार २३ जुलै दुपारी २-०३ पाण्याची उंची ४.६६ मीटर.
१६) शुक्रवार २४ जुलै दुपारी २-४५ पाण्याची उंची ४.६१ मीटर.
१७) बुधवार १९ ऑगस्ट दुपारी १२-१७ पाण्याची उंची ४.६१ मीटर.
१८) गुरुवार २० ऑगस्ट दुपारी १२-५५ पाण्याची उंची ४.७३ मीटर.
१९) शुक्रवार २१ ऑगस्ट दुपारी १-३३ पाण्याची उंची ४.७५ मीटर.
२०) शनिवार २२ ऑगस्ट दुपारी २-१४ पाण्याची उंची ४.६७ मीटर.