गिरीश महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदारांची धाकधुक वाढली

नाशिकच्या आमदारांची धाकधुक सध्या चांगलीच वाढली आहे. त्याला कारण ही तसंच आहे. विद्यमान आमदारांना तिकीट मिळेल की नाही, हे गोदामैय्याला माहिती, असं विधान सरकारमधले वजनदार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती गिरीश महाजन यांनी केलं आहे. नाशिकच्या रामकुंडावर पर्यटन विभागानं गुरूवारी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महाजनांनी हे विधान केलं. 

Updated: Sep 20, 2019, 09:37 PM IST
गिरीश महाजनांच्या 'त्या' वक्तव्याने आमदारांची धाकधुक वाढली title=

नाशिक : नाशिकच्या आमदारांची धाकधुक सध्या चांगलीच वाढली आहे. त्याला कारण ही तसंच आहे. विद्यमान आमदारांना तिकीट मिळेल की नाही, हे गोदामैय्याला माहिती, असं विधान सरकारमधले वजनदार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती गिरीश महाजन यांनी केलं आहे. नाशिकच्या रामकुंडावर पर्यटन विभागानं गुरूवारी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी महाजनांनी हे विधान केलं. 

विशेष म्हणजे विद्यामान आमदार बाजुलाच उभे असताना महाजन असं बोलल्यामुळे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात पडलेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या आमदारांना पुन्हा तिकीट मिळेल का, याची चर्चा सुरू असतानाच महाजनांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.

सध्या भाजपमध्ये मोठ्य़ा प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे आता भाजप दुसऱ्या पक्षातून आलेल्या तिकीट देणार असेल तर सध्या भाजपचे विद्यमान आमदारांना आणि विरोधी पक्षातून आलेल्या किती आमदारांना तिकीट देणार हे पाहावं लागेल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये झालेली मेगाभरती ही आधीच्या भाजप कार्यकर्त्यांच्या पथ्यावर पडते की त्यांना पक्ष न्याय देईल हे आगामी काळातच कळेल.

पाहा काय बोलले गिरीश महाजन