अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला : रवी राणा

 Ravi Rana criticized on   Anil Parab : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला आहे, अशी टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली.  

Updated: May 26, 2022, 02:30 PM IST
अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला : रवी राणा title=

 मुंबई : Ravi Rana criticized on   Anil Parab : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला आहे. भगवान हनुमानाचा अपमान केला, त्याची शिक्षा अनिल परब यांना मिळत आहे, अशी टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली. (MLA Ravi Rana criticized on Shivsena Minister Anil Parab)

मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी परब यांनी खाल्ले आहे. अनिल परब यांच्यानंतर आता 
पोलीस अधिकारी संजय पांडे यांचा नंबर आहे. या दोघांनाही जेलची हवा खावी लागणार आहे, अशी जोरदार टीका रवी राणा यांनी केली.

महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबधित 7 ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. या प्रकरणी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली. त्यानंतर रवी राणा यांनी टीका केली आहे.

सूड बुद्धीने कारवाई - संजय राऊत 

ईडीकडून करण्यात आलेली ही कारवाई ही सूड बुद्धीने केली आहे. ईडीचा भाजपकडून गैरवापर करण्यात येत आहे. हे सगळे त्रास देण्यासाठी भाजपकडून चालले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना दोन जागांवर लढत आहे. दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत. आमचा विजय नक्की होईल. भाजपने तीन किंवा चार उमेदवार देखील द्यावे, असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला. तर संभाजी राजे यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, संभाजी राजे यांनी महाराष्ट्र नाही तर देश ताब्यात घ्यावा, अशी कोपरखळी मारली.