रत्नागिरी : Corona व्हायरसने जगभरात घातलेलं थैमान पाहता आता भारतातही त्यादृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाच्या दृष्टीने या व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडूनच काही महत्त्वाचे निर्देश काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये आता महाविद्यालयातील सांस्कृतीक कार्यक्रमांवरही गदा येणार असल्याचं चित्र आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार २० मार्चपर्यंतचे महाविद्यालयीन सांस्कृतीक कार्यक्रम पुढे ढकलले जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविशयीची माहिती दिली.
प्रशासनाकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल पाहता जवळपास साडेतीन हजार महाविद्यालयांना उद्देशून याविषयीचे आदेश काढण्यात आले आहेत. सध्याचा माहोल आणि एकंदर विचावरण पाहता विविध महाविद्यालयांमध्ये फेस्टीव्हल किंवा बऱ्याच कार्यक्रमांची रेलचेल असणारे हे दिवस. पण, या दिवसांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पाहता कोणत्याही प्रकारचं संकट परिस्थिती बिघडवू नये याच उद्देशाने कार्यक्रमांची तारीख पुढे ढकलण्यास सांगण्यात आलं आहे.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
अतिशय झपाट्याने चीनमागोनाग इतरही देशांमध्ये परसणाऱ्या कोरोना व्हायरसचे काही संशयित रुग्ण भारतातही आढळले आहेत. असं असलं तरीही नागरिकांनी घाबरुन न जाता या विषाणूची लागण रोखण्यासाठीचे प्रयत्न करावेत असं आवाहन करण्यात येत आहे.