राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत, भाजपला जोरदार टोला

राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाले. 

Updated: Aug 1, 2020, 10:35 AM IST
 राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत, भाजपला जोरदार टोला title=
संग्रहित छाया

अमरावती : राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्यांना या आंदोलनावरुन भाजपला चिमटा काढलाआहे. ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तेथे दुधाला किती भाव देण्यात येतो हे लक्षात घ्या. केवळ राजकारण करु नये, असा सल्लाही भाजपला दिला. 

 आज भाजपच्यावतीने दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नुसते आंदोलन न करता केंद्राकडूनही निधी आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजपने आंदोलन करतांना केंद्रातून निधी कसा आणता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. या देशात केंद्र सरकारात आपण आहात. केंद्राने फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे तिथे आपण दुधाला किती भाव देतो हेही तपासले पाहिजे, फक्त राजकारण करायचं म्हणून आंदोलन करु नये, असे बच्चू कडू म्हणाले.

तसेच मी सुद्धा दूध आंदोलक शेतकऱ्यांन सोबत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू परंतु यामध्ये केंद्र सरकारचा ही खारीचा वाटा असला पाहिजे त्यामुळे केंद्र सरकारनेही दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच नाही तर कमीत कमी दोन रुपये तरी अनुदान देण्यासाठी पुढाकार घ्यावा या देशात केंद्र सरकार पण आहे त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये असे बच्चू कडू म्हणाले.

मागच्या वेळेला विदर्भाचे मुख्यमंत्री होते, तेव्हा विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक दमडी दिली असेल तर फडणवीसांनी सांगावे. भाजपने आंदोलन करतांना आपली नैतिकता तपासावी, असा टोला लगावत महाराष्ट्र सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूला उभे करण्याचा प्रयत्न करु, असे दूध आंदोलकांना त्यांनी यावेळी आश्वासीत केले.

दरम्यान आज राज्यभरात ठिकाणी शेतकरी संघटना शेतकरी व भाजप कडून हे आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये दुधाला दहा रुपये अनुदान, भूकटीला पन्नास रुपये अनुदान त्यानंतर ३० रुपये दुधाला भाव अशा मागण्या आंदोलकांनी राज्य सरकारकडे केलेल्या आहे.