औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिकेत गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरम वरून राडा झाला होता. सेना भाजप एमआयएम नगरसेवकामध्ये मध्ये मारामारी झाली होती. त्या नंतर एमआयएम पक्षाने वंदे मातरम गीताचे वेळी उभा न राहणाऱ्या नगरसेवकांना नोटीस बजावली होती आणि वंदे मातरमच्या वेळी उभे राहण्याचे आदेशीत केले होते.
आज पुन्हा एमआयएम पक्षाच्या काही नगरसेवकांनी पक्षाचा आदेशही झुगारला आहे, आणि सभा सुरु होते वेळी वंदे मातरमचे आदेश देताच एमआयएमच्या दोन नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले आणि वंदे मातरम संपताच पुन्हा सभागृहात आले. तर दोन नगसेवकांनी वंदे मातरम संपल्यावरच सभागृहात येणे पसंत केले. यामध्ये गटनेता नासेर सिद्दीकी आणि समिना शेख यांचा समावेश आहे.