दाऊदच्या भावाला मदत करणारे ते दोन नगरसेवक कोण?

इकबाल कासकरच्या खंडणीप्रकरणात ठाण्यातल्या राजकीय नेत्यांचं कनेक्शन उघड झालंय.

Updated: Sep 19, 2017, 08:47 PM IST
दाऊदच्या भावाला मदत करणारे ते दोन नगरसेवक कोण? title=

ठाणे : इकबाल कासकरच्या खंडणीप्रकरणात ठाण्यातल्या राजकीय नेत्यांचं कनेक्शन उघड झालंय. ठाण्यातले दोन नगरसेवकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. त्यामुळं या दोन नगरसेवकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

राजकीय नेत्यांचाही यात सहभाग आहे का याची चौकशी करणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिलीय. आता हे दोन नगरसेवक नेमके कोण आणि कोणत्या पक्षाचे आहेत याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.