...तर दुधाचे दर लिटरमागे 5 रुपयांनी वाढणार

ऑगस्ट महिन्याची रक्कम उत्पादकांना देण्यात आली मात्र त्यानंतर आतापर्यंतची रक्कम मिळालेली नाही. 

Updated: Nov 24, 2018, 07:31 AM IST
...तर दुधाचे दर लिटरमागे 5 रुपयांनी वाढणार  title=

मुंबई :  पेट्रोल डिझेलच्या दरात दिवसेंदिवस कपात होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळालायं पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नसणार आहे. कारण पेट्रोल कमी झालं तरी आता तेच पैसे दूधासाठी मोजावे लागणार की काय ? असा प्रश्न उपस्थित होतोयं. हो. दूध दर लिटरमागे पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेसाठी हा पुन्हा एकदा धक्का असणार आहे. दूध उत्पादकांना 5 रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेऊनही ५0 दिवसांत प्रत्यक्ष ती रक्कम न दिल्याने या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशाराचा दूध उत्पादकांनी दिलाय. उत्पादकांना दर कमी मिळत असल्याने अनुदान देण्याचा निर्णय जुलैमध्ये राज्य सरकारने घेतला होता. ऑगस्ट महिन्याची रक्कम उत्पादकांना देण्यात आली मात्र त्यानंतर आतापर्यंतची रक्कम मिळालेली नाही.

दूध संघाचा इशारा 

सरकारने 15 डिसेंबरपर्यंत अनुदान न दिल्यास त्या योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिला.

त्यामुळे दुधाचे दर वाढविणार की नाही यावर उत्पादकांनी बोलण्यास नकार दिला.

मात्र अनुदान योजनेतून बाहेर पडल्यास दुधाचा दर वाढविण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय नसल्याचे सांगण्यात येतंय.