Kalyan Fire : कल्याण येथे इमारतीत मध्यरात्री आग; आजी, नातीचा होरपळून मृत्यू

Kalyan Fire News : कल्याणच्या घास बाजार येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास आग. आगीत दोघींचा मृत्यू.

Updated: Jan 17, 2023, 09:46 AM IST
Kalyan Fire : कल्याण येथे इमारतीत मध्यरात्री आग; आजी, नातीचा होरपळून मृत्यू title=

Kalyan Fire : कल्याणमध्ये एका इमारतीमध्ये आग लागून दोघांचा मृत्यू झाला. (Maharashtra News in Marathi) कल्याणच्या घास बाजार इथल्या शफिक खोटी मिटी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली होती. यावेळी आजी आणि नातीचा होरपळून मृत्यू झाला.

 या आगीत खातिमा माईनकर आणि इब्रा शेख या आजी नातीचा मृत्यू झाला. दरम्यान आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. ही या शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आजी आणि नात या दोघीच रहात होत्या. रात्री एक वाजता लाईट गेली होती. दोन तासाने लाईट आल्यानंतर अचानक घरातील हॉलमध्ये प्रथम आग लागली. आजी आणि नात या दोघी बेडरुममध्ये झोपल्या होत्या. धूर आल्याने लक्षात आले. त्यानंतर त्या खोलीबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉलला आग लागल्याने दोघीना बाहेर पडता आले नाही. त्याचवेळी आगीचा भडका उडल्याने आणि धुराने दोघी गुदमरल्यात.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश आली. ही या शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय.