घर घेणाऱ्यांसाठी Good News, पुण्यासह कोल्हापूर, सोलापुरात घर घ्यायचं आहे का? अधिक वाचा

MHADA House Lottery News : घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी खूशखबर आहे.  पुणे विभागातील नागरिकांसाठी 4 हजार 744 घरांची ही लॉटरी असणार आहे. 

Updated: Jun 3, 2022, 08:50 AM IST
घर घेणाऱ्यांसाठी Good News, पुण्यासह कोल्हापूर, सोलापुरात घर घ्यायचं आहे का? अधिक वाचा title=

पुणे : MHADA House Lottery News : घर घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी खूशखबर आहे. पुणे विभागात म्हाडा लॉटरी काढणार आहे. पुणे विभागातील नागरिकांसाठी 4 हजार 744 घरांची ही लॉटरी असणार आहे. 

येत्या काही दिवसांत याबाबत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश आहे. अत्यल्प, अल्प गटांसाठी ही घरं उपलब्ध असतील. दरम्यान, मुंबईत म्हाडा दिवाळीमध्ये तीन हजार घरांची सोडत काढणार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहाडी गोरेगाव, मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली.  

गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्यावतीने (म्हाडा) पुणे विभागातील नागरिकांसाठी घरांची सोडत काढण्यात येणार असल्याने यावर नागरिकांच्या उड्या पडण्याची शक्यता आहे. ‘गेल्या काही वर्षातील पुणे विभागाच्या म्हाडाची ही दहावी सोडत ठरली आहे.

 पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणच्या  घरांची ऑनलाइन पद्धतीने सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करुन त्यानंतर इच्छुकांना घरांसाठी अर्ज भरता येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीत अर्ज भरता येईल.