Heat Wave in Maharashtra: मागील काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. राज्यातील थंडीचा जोर कमी झाला आहे. फ्रेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे.राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे (Extreme Heat In Maharashtra). अनेक भागात तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांनी दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये अस आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे (Weather Update).
राज्यात काही ठिकाणी दिवसा कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. तर दुसीरकडे रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी अवस्था राज्यातील काही भागात दिसून येत आहे. विदर्भातील अकोला, वाशिम तसेच रत्नागिरी, पणजीम, अमरावती, पुणे या भागात तापमानात वाढ झाली असून पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होणार आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाचा परिणाम धरण आणि तलावातील पाणीसाठ्यावर होत आहे. झपाट्याने पाण्याची पातळी कमी होत असल्याचं चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 52.86 टक्के एवढा जलसाठा आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि सात मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात 23 टक्क्यांची घट झाली आहे.
मार्च महिन्याच्या सुरवाती पासूनच उन्हाचा चटका वाढणार आहे.नागरिकांना हवामान विभागच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.सकाळी 11 वाजता ते 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक काम असेल तरच घरा बाहेर पडावे. तसेच जास्तीत जास्त पाण्याचा वापर देखील करावं. तसेच वाढत्या तापमानामुळे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी लोक अन्न आणि कपड्यांमध्ये अनेक विशेष बदल करतात. उन्हाळ्याच्या हंगामात कडक उन्हामुळे आणि उष्माघातामुळे लोक आजारी पडतात. यामुळेच उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते त्याची पूर्तता होणे महत्वाचे ठरते. अशावेळी उन्हापासून आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, व शरीराला थंड करण्यासाठी लोकं थंड पेये इत्यादींचा अवलंब करतात. पण कोल्डड्रिंक्सचे सेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा स्थितीत काही देशी पेयांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःला वाचवू शकाल आणि तुम्ही निरोगीही रहाल.