अमरावती : अतीदुर्गम आणि आदिवासी भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांची तीन वर्षानंतर सपाट भागात बदल्या गेल्या गेली पाहिजे, असा नियम असताना अमरावती जिल्यातील आदिवासी भागातील १२ ते १३ वर्षांपासून बदलीच्या प्रतिक्षेत आहे.
अप्रिल २०१६मध्ये बादलीची प्रक्रिया पार पडली असतांनाही या शिक्षकां ना बदलीचे आदेश न मिळल्याने या अन्यायग्रस्त शिक्षकांनी अमरावती जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरु केले असून या अन्यायग्रस्त शिक्षकाचा उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.
अमरावती जिल्यातील मेळघाट आदिवासी भागात कुठलेही अधिकारी कर्मचारी नोकरी करण्यास तयार नसतात त्या करिता विशेष नियमाअंतर्गत किमान तीन वर्ष मेळघाटत सेवा देण्याची सक्ती केली होती.
तीन वर्षात बदली करण्याचा नियम असतानाही १२ ते १३ वर्ष होऊनही मेळघाटात बादल्या होत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून मेळघाट शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरवठा केल्यानंतर या वर्षी न्याय मिळाला आणि ३००पेक्षा जास्त शिक्षकांना बदलीची संधी मिळाली. मात्र सपाट भागातील शिक्षकानी या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याने या शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या.
न्यायालयाने सुद्धा अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला. मात्र जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी, काही शिक्षक सनकी असल्याचा आरोप शिक्षकांचा आहे. गेल्या बारा ते चौदा वर्षे अती दुर्गम भागातील शाळेत सेवा दिली. त्यामुळे अनेक कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. नियम असतांनाही जिल्हा परिषद प्रशासन आमच्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.