जळगावात शिवसेनेचा महापौर, भाजप सत्तेबाहेर

Jalgaon Mayor Election: महापौर निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. 

Updated: Mar 18, 2021, 02:37 PM IST
जळगावात शिवसेनेचा महापौर, भाजप सत्तेबाहेर title=

जळगाव : Jalgaon Mayor Election: महापौर निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) महापौर (Mayor) जयश्री महाजन (Jayashree Mahajan) या विजयी झाल्या आहेत. भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांना 45 मते तर भाजपच्या प्रतिभा काप यांना 30 मते मिळाली. शिवसेने उमेदवाराचा 15 मतांनी विजय झाला.

जळगाव पालिकेत भाजपला शिवसेना जोरदार 'दे धक्का' दिला आहे. महापालिकेच्या महापौर ((Jalgaon Mayor) आणि उपमहापौर (Deputy Mayor) पदासाठी आज ऑनलाइन पद्धतीने निवडणूक (Election) झाली. भाजपचा एक गट निवडणुकीआधीच शिवसेनेला जाऊन मिळाला त्यामुळे आज जळगावात सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती  दिसून आली आहे. (Jalgaon Municipal Election: BJP Loss, Shiv Sena Won) तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील हे विजयी झाले आहेत.

निवडणूक (Mayor Elections) जळगाव शहराची असली तरी दोन्ही पक्षातले अनेक नगरसेवक ठाणे आणि नाशिकमधून मतदान प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे 27 नगरसेवक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. तसेच ते ठाण्यातील 'द बाईक सूरज प्लाझा' नावाच्या हॉटेलमध्ये असल्याची माहिती 'झी 24 तास'ने दिली होती. 

शिवसेनेच्यासोबत एमआयएमचे 3 आणि शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत. म्हणजेच एकूण 40 नगरसेवक या हॉटेलमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. राज्यातील सर्वांचे लक्ष जळगाव महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे महापालिकेतील भाजपची सत्ता गेली आहे.