Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे.  आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.

Updated: Dec 25, 2022, 12:07 PM IST
Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती title=
Coronavirus Updates

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे. जपानमध्ये काल दिवसभरात कोरोनानं 371 जणांचा बळी घेतला. (Coronavirus Updates) तर चीनमध्ये दिवसाला पाच हजार लोकांचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आलेय. तर रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतातही आता काळजी घेण्यात येत आहे. दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून सतर्क केले आहे. (Maharashtra news) त्यानंतर राज्य सरकारने खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.

गणपतीपुळे मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती 

Ganpatipule Ganpati : रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती करण्यात आलीये. (Ganpatipule temple in Ratnagiri) आजपासून कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि पुजारी यांना मास्क अनिवार्य करण्यात आलाय.. तर येणाऱ्या भाविकांनाही कोरोन नियमांचे पालन करण्याचा आवाहन करण्यात आलंय. कोरोनाचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून गणपतीपुळे देवस्थानानं हा निर्णय घेतला आहे. 

जेजुरीत खंडेरायाच्या मंदिरात कोरोना नियम लागू

जेजुरीत खंडेरायाच्या मंदिरात कर्मचारी आणि अधिका-यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. भाविकांना मास्कसक्ती केली नसली तरी कोरोनाच्या नियमांचं पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मंदिर समितीनं हा निर्णय घेतलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करण्यात येईल, असंही मंदिर प्रशासनानं सांगीतले आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात खबरदारी

कोरोनाचा धोका लक्षात घेता आणि नवीन वर्षामध्ये भक्तांची संख्या वाढते म्हणून राज्यातील प्रसिद्ध मंदिर शिर्डीतील साईबाबा (Shirdi Saibaba) मंदिरात खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी साईबाबा संस्थानने (Shri Saibaba Sansthan Trust) आवाहन केलं आहे. 

दगडूशेठ हलवाई गणपती, मास्क वापरण्याच्या सूचना 

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Dagdusheth Halwai Ganapati Temple Pune) सुट्ट्यांदरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता आता मंदिर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत त्यांना मास्क मोफत वाटले जात आहेत. तर मंदिर परिसरात मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून आवाहन करण्यात येत आहे.

कोल्हापूर अंबाबाई मंदिरात मास्क सक्ती 

नवीन व्हेरिएंट हा अद्याप महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात (kolhapur news) दाखल झाला नसला तरी काळजी घेणे महत्त्वाचं असल्याचं कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात नियम कडक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील (ambabai mandir) कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली असून येणाऱ्या काळात करोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन भाविकांना सुद्धा मास्क सक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. 

तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात मास्क सक्ती

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर मास्क सक्ती करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर आणि परिसरातही मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मास्क हा बंधनकारक असणार आहे. मास्क सक्तीचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आहेत.

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात मास्कचं वाटप

Akkalkot - अक्कलकोटला स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी (Shree Swami Samarth Samadhi Math) जाणार असाल तर मंदिर समितीने घेतलेला निर्णय आधी जाणून घ्या. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. मंदिर समितीने भक्तांना (Shri Swami Samarth ) आवाहन केलं आहे की, त्यांनी मास्क घालून मंदिरात यावं. यापार्श्वभूमीवर मंदिर समितीने भक्तांना मास्कचं वाटपही केलं आहे.