देवरुखमध्ये शहीद जवान स्मारक, टी -५५ बजरंग रणगाडा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शहीद जवान स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकासाठी दिल्ली संरक्षण मंत्रालयाने टी -५५ बजरंग हा रणगाडा दिलाय. तो देवरुखमध्ये दाखल झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2018, 04:08 PM IST
देवरुखमध्ये शहीद जवान स्मारक, टी -५५ बजरंग रणगाडा दाखल title=

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शहीद जवान स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकासाठी दिल्ली संरक्षण मंत्रालयाने टी -५५ बजरंग हा रणगाडा दिलाय. तो देवरुखमध्ये दाखल झालाय.

१९६१ च्या युद्धात हा रणगाडा वापरण्यात आला होता. हा रणगाडा पुणे येथून देवरुखला आणण्यात आलाय. रणगाडा आल्यानंतर लहान मुलांनी एकच गराडा घातला.

शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी, नव्या पिढीला इतिहास माहित व्हावा, यासाठी हे स्मारक उभारण्यात आलेय. याच स्मारकासाठी एक तोफही मंजूर करण्यात आलेय. 

तसेच या स्मारकात परमवीर चक्र प्राप्त वीरांचा इतिहासही उपलब्ध होणार आहे. हे स्मारक मार्च महिन्यात सर्वांसाठी खुले होईल. स्मारकाच्या काम अंतिम टप्प्यात आहे.