कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी

उपनगरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झालेतय. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत ही भरती होणार असून थेट मुलाखत होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2018, 01:04 PM IST
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी title=

मुंबई : उपनगरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झालेतय. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत ही भरती होणार असून थेट मुलाखत होणार आहे.

वैद्यकीय अधिकारी ८ पदे, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - १५, स्टाफ नर्स ११, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ रिक्त ८ पदे, औषध निर्माता एक पद तर सहाय्यक परिचारीका प्रवविका एकूण ४५ पदे भरण्यात येणार आहेत.

२१, २२ आणि २३ या तीन दिवसात मुलाखती होणार आहेत. सकाळी ९ ते १० वेळेत अर्ज स्विकारण्यात येणार आहे. अर्ज छाननी १० ते ११ या वेळेत होऊन दुपारी १२ पासून प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीसाठी www.kdmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

जाहिरात पाहा :