कंबोडियात मराठी मुलांना बनवलं गुलाम..परदेशात नोकरीला जाताय तर सावधान..क्रूरतेचा VIDEO एकदा पहाच

महाराष्ट्रातील अनेक उच्चशिक्षित तरुणांना कंबोडियासारख्या देशात गुलाम म्हणून डांबून ठेवलं जातंय... व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता  त्यांचं शोषण केलं जातं... काम करायला नकार दिला तर बेदम मारहाण केली जाते..

Updated: Sep 24, 2022, 07:13 PM IST
कंबोडियात मराठी मुलांना बनवलं गुलाम..परदेशात नोकरीला जाताय तर सावधान..क्रूरतेचा VIDEO एकदा पहाच  title=

तुम्ही किंवा तुमचे कुणी तरुण नातेवाईक परदेशात नोकरीला जाणार असतील तर सावधान(people goes to foreign for job).. कारण कंबोडियात(cambodia) उच्चशिक्षित मराठी तरुणांना चक्क गुलामासारखी वागणूक(highly educated) (slaves) दिली जात असल्याचा प्रकार उजेडात आलाय... आयटी क्षेत्रातील(IT sector) उच्चशिक्षित तरुण-तरुणींना लाखो रुपयांच्या आर्थिक पॅकेजचं (with good job and package) आमीष दाखवून त्यांना सायबर गुन्हेगारीत(cyber crime) ओढलं जातंय.... कबीर शेख नावाच्या तरुणानं उस्मानाबाद पोलिसांच्या मदतीनं कशीबशी या गुलामगिरीतून स्वतःची सुटका करून घेतली.

त्याच्यासह आणखी 7 भारतीय उच्चशिक्षित तरुण-तरुणीही गुलामगिरीच्या या जाचातून बाहेर पडलेत.. मात्र अजूनही अनेक भारतीय तरुण-तरुणी सायबर गुन्हेगारांच्या गुलामगिरीच्या चक्रव्यूहात अडकलेत... ही बातमी तुमचं डोकं चक्रावून टाकू शकते...

महाराष्ट्रातील अनेक उच्चशिक्षित तरुणांना कंबोडियासारख्या देशात गुलाम म्हणून डांबून ठेवलं जातंय... सायबर गुन्हेगारीसाठी त्यांचं शोषण केलं जातं... काम करायला नकार दिला तर बेदम मारहाण केली जाते... त्याचीच ही धक्कादायक आणि खळबळजनक कहाणी... उस्मानाबादमधल्या कबीर शेख नावाच्या तरुणानं हा प्रकार उजेडात आणला... तो या सायबर गुलामगिरीचा शिकार कसा बनला, ते पाहूया.(marathi youngsters became slaves in cambodia they got into cyber crime and leaving hell life) 

उस्मानाबादला राहणारा कबीर शेख सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट(Cyber security) आहे पुण्यात आयटी कंपनीत(pune IT company) कामाला असलेल्या कबीरला कंबोडियात नोकरीची(job in cambodia ) ऑफर मिळाली त्याचा पगार ठरला 5 हजार डॉलर कबीरसारखेच आणखी 7 भारतीय त्या कंपनीत कामाला होतं, त्यात

एका मुलीचाही समावेश होता कंपनीचं कंपाऊंड 15 फूट उंच... त्याभोवती तारेचं काटेरी जाळं कंपनीत कर्मचा-यांना मारहाण होत असल्याचं कबीरनं पाहिलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला... भारतात लग्न जुळवणा-या मेट्रोमोनियल साईटवर सुंदर मुलींचे

खोटे प्रोफाईल तयार करण्याचं काम त्यांना देण्यात आलं. त्या माध्यमातून भारतीय पुरूषांशी चॅटिंग करून त्यांना आर्थिक गंडा घातला जायचा दरदिवशी सुमारे 5 कोटी रुपयांचा चुना भारतीय पुरूषांना लावण्याचं काम हे सायबर गुन्हेगार करतात कबीर शेख आणि

आणखी सात भारतीयांनी हे काम करण्यास नकार देताच त्यांचा छळ सुरू झाला... कबीरनं कसाबसा उस्मानाबादल्या(usmanabad) आपल्या कुटुंबीयांशी संपर्क केला. त्यांना खरी कहाणी सांगितलं. कबीरच्या वडिलांनी उस्मानाबाद पोलिसांत धाव घेतली... तब्बल २२ दिवस भयंकर अत्याचार अनुभवल्यानंतर कबीर आणि सात भारतीयांची सुटका झाली...

 

हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर भारत सरकारनं सावधगिरीचा इशारा दिलाय. लाखो रुपयांच्या पगाराचं आमीष दाखवून खोटे जॉब देणा-या टोळ्या सध्या कार्यरत झाल्यात. आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुणांना ते टार्गेट करतायत... अशा

धोकेबाजांपासून सावध राहावं, असं आवाहन आता भारत सरकारच्या वतीनं करण्यात आलंय... कबीर शेख आणि हे सात भारतीय तरुण नशीबवान ठरले... मात्र आणखी 15 हून अधिक भारतीय तरुण तरुणी कंबोडियात गुलामांसारख्या भयंकर यातना सोसत आहेत. त्यांचीही लवकरात लवकर सुटका व्हावी, हीच अपेक्षा...