पुण्यात सरकार विरोधात मराठा समन्वय समितीचं आंदोलन

विनायक मेटेंच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन 

Updated: Aug 9, 2020, 12:56 PM IST
पुण्यात सरकार विरोधात मराठा समन्वय समितीचं आंदोलन title=

पुणे : पुण्यात मराठी समन्वय समितीचं महाविकासआघाडी सरकारविरोधात जागरण गोंधळ आंदोलन सुरु आहे. विनायक मेटेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. बालगंधर्व चौकात हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात राज्यातील अनेक मराठा संघटना सहभागी झाले आहेत.

राज्य सरकार मराठा आरक्षण कोर्टात टिकावं म्हणून कोणतीही तयारी करत नाही. या समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. त्यांना या समितीमधून हटवा आणि मराठा आरक्षण वाचवा अशी हाक देण्यासाठी आजचं आंदोलन सुरु असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे.

विनायक मेटेंनी म्हटलं की, 'राज्यात आता सरकारच्या विरोधात असेच जागरण गोंधळ आंदोलन केले जाईल. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात हे आंदोलन आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता कार्यक्षम मंत्री द्यावा. एकनाथ शिंदेच नाही तर दुसऱ्या समाजाची जाण असलेला मंत्री दिला तरी चालेल.' असं ही मेटेंनी म्हटलं आहे. 

'मी शिवस्मारक समितीचा जानेवारीतच राजीनामा दिला आहे. स्मारक पदाबाबत जे माझ्यावर आरोप करत असतील ते मूर्ख आहेत.' असं ही उत्तर त्यांनी यावेळी दिलं आहे.