Maratha Reservation : सग्या सोयऱ्यांना लाभ देण्यासाठी कायदा करावा यासाठी 19 जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे..यासह 20 तारखेच्या आत नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र (Kunabi Certificate) द्या, ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी सापडलेल्या लोकांची यादी लावण्यात यावी असं जरांगे पाटील यांनी म्हंटलंय. यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांचे सर्व शब्द आणि मागणी ही कागदावरती लिहून घेतली. त्यात सगे सोयरे या शब्दाची सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटलांनी केलेली व्याख्या यात दुरुस्ती करण्याची मागणी जरांगे पाटलांची आहे. या चर्चेनंतर बच्चू कडू हे मुंबईला निघाले असून याविषयी तोडगा कसा निघेल याकरिती ते सरकारशी चर्चा करणार आहेत..
सदावर्ते यांची याचिका
जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला स्थगिती मिळावी यासाठी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी ही याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केलीय. मुंबईत मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला जरांगे उपोषण करणार आहेत. या आंदोलनात मराठा आरक्षण समर्थक मुंबई मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना फटका बसू नये यासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात यावं किंवा आंदोलन मुंबईत होऊ नये, अशी मागणी सदावर्तेंनी याचिकेतून केलीय. मुंबई हायकोर्टात 40 नंबर न्यायालयात ही सुनावणी होण्याची शक्यता आहे...
मनोज जरांगे ठाम
मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईतील 20 जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत. मुंबईत 144 कलम लागू केला असलं तरी मुंबईत जाणारच असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलाय. राज्य सरकारनं आधी 18 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू केली होती. त्यामुळेच आपण 20 जानेवारीच्या मोर्चाचं नियोजन केलं. मात्र आता सरकारनं 144 कलमाला मुदतवाढ दिल्यामुळे जरांगेंनी नाराजी व्यक्त केलीय.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय. आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय.
भूजबळ वि. जरांगे
दरम्यान, जालन्यात पिस्तुल आणण्यात आल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील ओबीसी मेळाव्यात केला होता. यावर जरांगेंनी उत्तर दिलंय. आम्हाला माहित नाही मात्र, भुजबळांना कसं समजलं असा सवाल जरांगेंनी केलाय. तसंच भुजबळ पिस्तुलधाऱ्यांना आमच्या कार्यक्रमात घुसवतील असा आरोप करत गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी जरांगेंनी केलीय...