'माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर...'; जरांगेची अवस्था पाहून आरोग्य सेविकेचा सरकारला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मनोज जरांगेवर उपचार करा नाहीतर आत्महत्या करेन असा इशारा एका आरोग्य सेविकेने दिला आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 30, 2023, 11:44 AM IST
'माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर...'; जरांगेची अवस्था पाहून आरोग्य सेविकेचा सरकारला इशारा title=

Maratha Reservation : मराठा आरक्षणसा (Maratha Aarakshan) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्यावर उपचार करा नाहीतर मी आत्महत्या करेन असा इशारा नांदेडमधल्या एका आरोग्य सेविकेने दिला आहे. रेखा पाटील असे या आरोग्य सेविकेचे नाव आहे. आरोग्य सेविका रेखा पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांनी उपचार घेण्याची त्यांनी विनंती केली. जरांगे यांची तब्येत पाहून आरोग्य सेविका रेखा पाटील ढसा ढसा रडल्या. सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि जरांगे यांचा जीव वाचवावा अन्यथा आम्ही तलवारी घेऊन तुमच्या घरात घुसू असा इशारा त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.

आता त्यांची जगण्याची लिमिट संपली आहे. मी स्वतः आरोग्यसेविका आहे. माझ्या भावावर उपचार करा. आज आम्हाला आरक्षण महत्त्वाचं नाही माझा भाऊ महत्त्वाचा आहे. माझ्या भावाचं जर हृदय बंद पडलं तर मी स्वतः तलवार घेऊन येईल, असा इशारा आरोग्य सेविका रेखा पाटील यांनी दिला आहे. 'आरक्षण मिळणारच आहे. मात्र आता मनोज जरांगे यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. आपण बघ्याची भूमिका घेणे अत्यंत मुर्खपणा ठरु शकतो. आपण त्यांचा जीव घ्यायचा का? त्यानंतर आरक्षण घेऊन करायचं काय? माझा भाऊ आरक्षण पाहायला जिवंत राहिला पाहिजे. तो तडफडून मरत आहेत, हे बघत राहायचं का?' असा सवालही रेखा पाटील यांनी विचारला.

"सरकार मनोज जरांगे यांचा जीवच घ्यायचा आहे. सरकारने 40 दिवस काय केले. सरकारला जरांगे भाऊंचा जीवच घ्यायचा आहे. 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यावेळी त्यांनी काहीच नाही केलं. साधी एक बैठकही नाही घेतली. यांना पुरावे हवे होते, त्यांना पुरावे देखील दिले आहेत. आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?," असेही रेखा पाटील म्हणाल्या.