मराठा आरक्षण टिकलं तर भाजपला श्रेय मिळेल म्हणून ठाकरे सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला

 महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

Updated: May 5, 2021, 06:24 PM IST
मराठा आरक्षण टिकलं तर भाजपला श्रेय मिळेल म्हणून ठाकरे सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला title=

अमर काणे, झी २४ तास, नागपूर  : मराठा आरक्षण टिकलं असतं तर, भाजपला श्रेय मिळालं असतं म्हणून महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीसांनी सभागृहाची फसवणूक केली असं ते म्हटले. त्यांनी केलेल्या सर्व टीकेला लगेचच फडणवीस यांनीही उत्तरे दिली आहेत.

अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अपेक्षेप्रमाणे आपले अपयश लपवण्यासाठी हे केंद्र व मागील राज्य सरकार वर सर्व ढकलत आहे. अशोक चव्हाण, नवाब मलिक खोटे बोलत आहेत.हे आरक्षण जर टिकले असते तर credit भाजप ला मिळाले असते म्हणून या सरकार ने मराठा आरक्षण चा मुडदा पाडला आहे, अशी घणाघाती टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अहवाल English मध्ये आहे. त्याच्या अनुवादाबद्दल बोललेले नाही तर, त्याच्या प्रस्तावनेच्या अनुवादाबद्दल भाष्य केले होते. ते नसल्यामुळे न्यायालयाची अडचण झाली होती. सरकारने प्रस्तावनेचे भाषांतर मांडले नाही. असंही फडणवीस म्हटले आहे.
 
आम्ही उच्च न्यायालयाला सांगितले होते की आमचा कायदा 102 व्या घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे, आम्ही फक्त त्यात सुधारणा करतोय.  हे महाविकास आघाडी सरकार कमी पडले.

सध्या सरकार मराठा आरक्षणावरून हात झटकत आहे. केंद्र सरकारकडे पाठवू वेगैरे बोलून चालणार नाही. तुम्हाला कारवाई पूर्ण करावीच लागेल, सरकार खोटं बोलून दिशाभूल करीत आहेत.  
जर आज आम्ही सत्तेत असतो तर ज्याप्रमाणे उच्च न्यायालयात कायदा टिकविला, स्थगिती येऊ दिली नाही. तसेच आम्ही समन्वय साधून सर्वोच्च मध्ये हा कायदा टिकविला असता. असेही फडणवीसांनी यावेळी म्हटले.