औरंगाबाद: काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी गंगापुरचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यात पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. आज काकासाहेब शिंदेच्या कुटुंबियांना सरकारनं १० लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. शिवाय शिंदेंच्या धाटक्या भावाला सरकारी नोकरीचं आश्वासनही दिलंय.
जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी ही घोषणा केलीय. आश्वासनानंतर शिंदे कुटुबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केले. शिंदेंनी काल मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरमध्ये गोदावरी पात्रात उडी घेतली. त्यांना प्रवाहातून बाहेर काढण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमिवर आज औरंगाबाद शहरातले शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आले आहेत.