रत्नागिरीच्या समुद्रात डॉल्फिनचा सिनेमॅटिक अंदाज

डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेकवेळा बघितले असतील पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात तेही ड्रोनच्या माध्यमातून... 

Updated: Dec 25, 2017, 11:37 AM IST
रत्नागिरीच्या समुद्रात डॉल्फिनचा सिनेमॅटिक अंदाज title=

रत्नागिरी : डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेकवेळा बघितले असतील पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात तेही ड्रोनच्या माध्यमातून... 

रत्नागिरीजवळच्या कुर्ली गावातील समुद्रात एकाचवेळी अनेक डॉल्फिन कॅमे-यात कैद करण्यात आलेत.....मास्टर शॉट आणि रेस्ट्रॅटो सिनेमॅटीक यांनी हे डॉल्फिन त्यांच्या कॅमे-यामध्ये कैद केले आहेत..रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर किना-यावर डॉल्फिनचं अनेकवेळा दर्शन होतं.

काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या मि-या समुद्र किनारी देखील डॉल्फिनचा थवाच्या थवा निदर्शनास आला होता मात्र रत्नागिरीतल्या कुर्ली समुद्र किनारी दिसलेल्या या डॉल्फिनच्या थव्यामध्ये 100 पेक्षा जास्त डॉल्फिन एकाचवेळी मुक्तपणे विहार करताना दिसतायत...

नाताळची सुट्टी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी ही डॉल्फिन दर्शन मिळणं म्हणजे सुखद धक्काच असणार आहे... कुर्ली येथील खोल समुद्रात मनसोक्त विहार करतानाची डॉल्फिनची ही खास दृश्ये.